अंगणवाडी विभाग
वेळापूर गावात सुसज्ज अशी अंगणवाडी इमारत आहे. अंगणवाडी केंद्र क्र. १६२ आहे. आंगणवाडी केंद्रात सेविका म्हणून सौ सोमेश्वरी सुरज शिंदे व मदतनीस म्हणून भाग्यश्री नामदेव पालवे काम बघतात
अंगणवाडी केंद्रात ० ते ३ वर्ष वयोगटातील एकूण - ६० मुले ३७ व २३ मुली आहे . तसेच ०३ ते ६ वर्ष वयोगटातील एकूण - ६५ मुले ३५ व मुली ३० आहे. अंगणवाडी मध्ये गरोदर महिलांची सख्या १४ असून त्यांना पूरक पोषण आहार दिला जातो.
अंगण वाडी मध्ये ०६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना घरपोच पूरक पोषण आहर दिला जातो.
अंगणवाडी केंद्रात घेतले जाणारे उपक्रम -
- अंगणवाडी मध्ये गरोदर मातेचे ओटीभरण
- नवजात बालकांना अन्न प्राशन कार्यक्रम ,
- नवजात बालकांना बेबी कीट पुरविणे
- अंगण वाडी केंद्रात सँम/ मँम मुलांची तपासणी करणे.
- अंगण वाडी केंद्रात हळदी कुंकू उपक्रम घेतले जातात.
- गरोदर माता बैठक
- लहान बालकांचे स्वागत (वेलकम मिलन)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना १५/०८/१९५६ रोजी झाली आहे. वेळापूर येथे इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत शाळा आहे. अध्यापनासाठी १ शिक्षक असून एक सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
अध्यापक माहिती
| अ.क्र. | आदर्श अध्यापक नाव | हुद्दा |
|---|---|---|
| १ | श्री. सचिन पोपट शेलार | मुख्याध्यापक |
| २ | सौ. शुभांगी लक्ष्मण शिंदे | सहाय्यक शिक्षक |
आदर्श शाळेची वैशिष्टे
- आदर्श इमारत
- मा. जिल्हा न्यायमूर्ती आ. गुजराती साहेब यांनी केलेला सत्कार
- सोलर वीजपुरवठा
- पिण्यासाठी फिल्टर पाणी उपलब्ध
- डिजिटल क्लासरूम
- प्रशस्थ क्रीडांगण
- उत्तम अन्नपूर्ण व्यवस्था
- स्वतंत्र मुले व मुली शौचालय
- हरित व स्वच्छ शालेय परिसर
- शालेय परिसरात सी.सी.कॅमेरा व्यवस्था
- स्वच्छ हात धुणे साठी हँडवाशिंग व्यवस्थ
- सुका व ओला कचरा वर्गीकरण कुंडी
- वर्गात बसने साठी बाकडे
- विविध सांस्कृतिक कार्यक्रम