वेळापूर येथे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून श्री. सचिन अपसुंदे काम बघतात .

वेळापूर गावातील मुख्य व्यवसाय शेती असून उर्वरित कामानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे जातात. गावातील मुख्यपिके कांदा , द्राक्ष , मका , सोयाबीन , गहू व इतर भाजीपाला  आणि कडधान्य घेतली जातात. पाण्याची सिंचन व्यवस्था हि पालखेड डावा कालवा व गोई नदी वर अवलंबून आहेत . गावात एकूण १०४ विहिरी व ४० कूपनलिका व ४ शेततळे आहेत. शेती साठी सोलर व महावितरण कंपनीच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो