गावाविषयी माहिती
गोई नदीवर वसलेले आदर्श असे वेळापूर हे गाव आहे , निफाड,चांदवड,येवला या तीन तालुक्यांच्या सीमेवर वसलेले गावं म्हणून वेळापूरची ओळख आहे.वेळापूर गावाची आख्यायिका अशी आहे की,पुरातन काळातील वेळासूर बाबांचे प्राचीन मंदिर व उंच टेकडी आहे. व त्याचे शिलालेख आजही पहावयास मिळतात.या वेळसुर बाबांच्या नावाचा अपभ्रंश होऊन गावाला वेळापूर असे नाव पडले असे जूने जाणकार सांगतात.
भौगोलिक स्थान
वेळापूर गावचे एकूण क्षेत्रफळ ३९४.१४ इतके आहेत. वेळापूर गावाचा संकेतांक क्र. ५५१३३४ आहेत . व गावाचा अक्षांश – २०.१४८४९५८३ व रेक्षांश ७४.२६५१०४९२८ " येवला , चांदवड आणि निफाड या तीन तालुक्याच्या सीमेवर व गोई नदी तीरावर वसलेले छोटेसे वेळापूर गाव आहे. वेळापूर हे गाव जिल्हास्तर पासून ६० कि.मी. व तालुक्यापासून २५ कि.मी. अंतरावर वसलेले आहे.
लोकजीवन
गावातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती असून त्या बरोबर आशिया खंडातीलं नंबर एक ची बाजारपेठ म्हणून नावलौकिक आलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 50 टक्के मजूर काम करतात. तसेच शासकीय नोकरी व खाजगी नोकरी व शिक्षणा निमित्त बाहेगावी जातात.
लोकसंख्या
गावाची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार( पुरुष ८८० व स्त्री ८७२ ) १७५२ इतकी आहे. अनुसूचित जाती २३९ आणि अनुसूचित जमाती २८४ गावाची एकूण कुटूब संख्या ३१४ आहेत.
संस्कृती व परंपरा
वेळापूर गावचे ग्रामदैवत म्हणून श्री गवळीबाबा मंदिर आहे या ग्रामदैवताची यात्रा दरवर्षी रामनवमीला भरली जाते जत्रेच्या माध्यमातून गावात कावड मिरवणूक गावातून काढले जाते तसेच सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. गावात अध्यात्मिक परंपरा असून गावामध्ये मागील 48 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह अविरतपणे सुरू आहे, हनुमान मंदिर श्रीराम मंदिर श्री सचिदानंद केरोब्बा महाराज अध्यात्म ध्यान मंदिर कालिका माता मंदिर खंडेराव मंदिर लक्ष्मी माता मंदिर येथे प्रकारचे मंदिरे गावात वसलेले आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत व व इमारती भवती असलेला बगिच्या तसेच रामंदिर समोर असलेला परीसर अतिशय प्रेक्षणीय आहेत
जवळची गावे
गावाच्या अवतीभवती पूर्वेस आंबेगाव , सोमठाणदेश दक्षिणेस पाचोरे बु ,पाचोरे खुर्द , मरळगोई पश्चिमेस लासलगाव , निमगाव वाकडा पिंपळगाव नजीक , ब्राम्हणगाव विंचूर व उत्तरेस वाकी खुर्द , वाकी बु गावे आहेत